Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

पुण्यात सिलेंडरमधुन गॅसची चोरी करणार्‍या टोळीला अटक

पुण्यात सिलेंडरमधुन गॅसची चोरी करणार्‍या टोळीला अटक

वानवडी पोलिसांची कामगिरी; प्रत्येक टाकीतून काढत होते १ किलो गॅस

marathinews24.com

पुणे – घरगुती सिलेंडमधील गॅस दुसर्‍या रिकाम्या टाकीत भरून काळाबाजार करणार्‍या टोळीचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ते प्रत्येकी टाकीतून एक किलो गॅस काढून अपहार करीत होते. टोळीकडून २ लाख ३७ हजारांचा ऐवज जप्त केला असून, अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पंकज किसनसिंग ठाकुर (वय २० रा. साडेसतरा नळी, अन्सारी फाटा, मांजरी, मुळ ता. फतेहबाद, जि. आग्रा, उत्तरप्रदेश) आणि प्रविण बंगालीराम कुमार (वय ३५ रा. मांजरी, पुणे मूळ- फतेहबाद, जि. आग्रा, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

रिक्षातून अंमली पदार्थाची विक्रीचा डाव उधळला – सविस्तर बातमी 

गणेशात्सवाच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी ४ सप्टेंबरला वानवडी पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी तपास पथकातील अंमलदार अमोल पिलाणे आणि अभिजित चव्हाण यांना सुर्यलोकनगरी सोसायटीतील गार्डनसमोर वैदवाडी परिसरात दोघेजण सिलेंडरमधील गॅस अवैधरित्या इतर टाक्यात भरत असल्याची माहिती मिळाली. ज्वलनशिल व स्फोटक पदार्थ गैररित्याने हाताळुन मानवी जिवीतास धोका उत्पन्न होईल असे कृत्य आरोपी करीत होते. त्यापार्श्वभूमीवर पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी पॅगो (क्रमांक एमएच १२ एलटी २०२८) टेम्पोतील आरोपी वाहनात घरगुती सिलेंडरला दोन्ही बाजुने रेग्युलटर पॉईप जोडुन गॅसची चोरी करीत असल्याचे दिसून आले.

तपास पथकाने दोघांनाही ताब्यात घेत चौकशी केली असता, आम्ही समीधा भारत गॅस एजन्सी, माळवाडी रोड, हडपसर परिसरातील कामगार आहे. भारत गॅसचे टाक्या वितरित करीत असतान घरगुती गॅसच्या प्रत्येक टाकीमधुन प्रत्येकी १ किलो गॅस दुसर्‍या टाकीत भरत असल्याची कबुली दिली. त्यांच्या टॅम्पोतुन विशेष तयार केलेला दोन्ही बाजुला रेग्युलटर, गॅसच्या टाक्या असा ऐवज जप्त केला आहे.ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडस वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, एपीआय उमाकांत महाडिक, अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, यतीन भोसले, विष्णु सुतार, बालाजी वाघमारे, अमोल गायकवाड, आर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे यांनी केली.

म्हणून गॅसचे वजन करूनच घ्या

घरगुती वापरचा सिलेंडर गॅसची टाकी ताब्यात घेताना नागरिकांनी संबंधिताकडून टाकीचे वजन तपासणी करून घेतली पाहिजे. तो व्यवस्थीत चेक करुन घ्यावा, काही जण फायद्यासाठी सार्वजनिक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधुन दुसर्‍या सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरत आहे. त्यामुळे आपली सुरक्षा आपणच घ्यावी, गॅस टाक्यांचे वजन करून फसवणूक टाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जर कोणी बेकायदेशीरपणे गॅस इतर टाक्यांत भरताना दिसून आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×