चंदननगर आणि फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी वडगाव शेरी आणि फुरसुंगीत घरफोडी करून ७ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी चंदननगर आणि फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुण्यात ट्रकच्या धडकेत महाविद्यायीन युवतीचा मृत्यू – सविस्तर बातमी
वडगाव शेरीतील धनलक्ष्मी सोसायटीमधील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ६२ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी ७४ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ जूनला घडली असून, याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करीत आहेत.
फुरसुंगीतील तरवडी वस्तीवरील गोकुळ बंगलो परिसरातून चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ५० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ४ लाख २७ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २६ जूनला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली असून, दिलीप कामठे वय ५९, रा. फुरसुंगी यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख तपास करीत आहेत.
सदाशिव पेठेत जेष्ठ महिलेचे दागिने हिसकावले
पुणे – शहरातील मध्यवती सदाशिव पेठेत पायी जात असलेल्या जेष्ठ महिलेला अडवून दुचाकीस्वार चोरट्यांनी लुटले आहे. महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांच्या सोन्याची चैन, मोबाइल असा ८५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २६ जूनला संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठेतील विठाई सदन परिसरात घडली आहे. याप्रकरणी ७६ वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसा अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७६ वर्षीय जेष्ठ महिला सदाशिव पेठेत राहायला असून, २६ जूनला संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठेतील विठाई सदन परिसरातून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांच्या सोन्याची दोन चैन, १० हजारांचा मोबाइल असा ८५ हजारांचा ऐवज हिसकावून नेला. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे सुसाट दुचाकीवर पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किरण पवार तपास करीत आहेत.
जेष्ठ महिला टारगेटवर, दुचाकीस्वार चोरटे सुसाट
शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरटे सुसाट असून, जेष्ठ महिलांना टारगेट करून लुट केली जात असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपुर्वी उपनगरात दागिने हिसकाविण्याच्या घटना आता मध्यवर्ती सदाशिव पेठेतही घडत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः दुचाकीस्वार चोरटे क्षणाधार्त दागिने, मोबाइल, पर्ससह इतर ऐवज लुटून नेत असल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे चोरट्यांविरूद्ध ठोस कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.